शेगावात एकादशीनिमित्त भक्तांची मांदियाळी

0

 

(Shegaon)शेगाव : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज गुरुवार तसेच आषाढी एकादशी असल्याने सकाळपासूनच शेगाव मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला. सध्या शेतात विविध कामे असल्याने इच्छा असतांना सुद्धा अनेकांना पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जान शक्य न झाल्याने विदर्भातील हजारो भाविकांनी विदर्भाचे पंढरपूर म्हणून ही ओळखल्या जाणाऱ्या संत नागरी शेगावात पोहचून आज श्री चरणी माथा टेकवण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात असलेल्या श्री विठ्ठल -रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.