(BULDHANA)बुलढाणा : देशातभरासह बुलढाणा जिल्ह्यात आज मुस्लिम बांधवांचा ईद उल अजहा म्हणजे बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या दिवशी बकऱ्याची कूर्बानी दिली जाते. ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद साजरी केल्यानंतर दोन महिन्या नंतर ईद उल अजहा बकरी ईद साजरी केली जाते. सकाळीच जामा मस्जिद येथून मुस्लिम समाजाने जुलुस काढून शहराबाहेरील मोती मस्जिद जवळील ईदगाहवर पोहचून सामूहिक नमाज पठण केली व एकमेकांना गळा भेट घेऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या,यावेळी (District Superintendent of Police Sunil Kadasane)जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी देखील ईदगाहवर उपस्थिती लावून मुस्लिम समाजाला बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या,विशेष या वर्षी बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने आषाढी एकादशीमूळे कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतल्याने हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे हे विशेष.