मूलबाळ होत नसल्यामुळं पत्नीला जिवंत जाळल्याचे उघड

0

 

(Jalna)जालना – कारमध्ये जळून मृत्यू झालेल्या विवाहितेच्या घातपाताचा अखेर उलगडा झाला आहे. कारमध्ये जळून पतीसमोरच पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना 24 तारखेला जालना जिल्ह्यातल्या तळणी- मंठा येथे घडली होती. (Savita Amol Solankhe)सविता अमोल सोळंखे असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून दोघांचे लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हते,अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देत होता. वारंवार अमोल सविताला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती. हाच राग मनात धरून पती अमोलने पत्नीला कारमध्ये जिवंत जाळले आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली, दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला.