(Wardha)वर्धा : आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्धा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांनी गर्दी केली.सरस्वती विद्या मंदिर येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी काढून विठ्ठल नामाचा जयघोष केला. विठ्ठल -रुक्मिणीच्या रूपामध्ये यावेळी काही विद्यार्थीलक्षवेधी ठरले. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनाकरिता लांबच लांब रांग दिसून आली यावेळी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त होता.