तीन जण पोलिसांच्या ताब्यात
(Solapur)सोलापूर -आज सोलापूरमध्ये दोन ठिकाणी पाकिस्तानच्या संदर्भात प्रिंट करण्यात आलेले फुगे आढळून आले. त्या दोन्ही ठिकाणाहून फुगे विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या संपूर्ण षडयंत्राचा सविस्तर तपास सोलापूरची पोलीस यंत्रणा करत आहे. यामध्ये कुठलेही जाती-धर्माचे आरोपी असतील तरी पोलीस सक्तीची कारवाई करतील अशी माहिती पोलिसांनी दिली. यातील दोन आरोपी हे ईदगाह मैदानाजवळ तर एक आरोपी हा सोलापूरच्या मुख्य बाजारपेठेत होता.