(Amravti)अमरावती : अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. यावेळी बिपरजॉय वादळाच्या फटक्यामुळे मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला. ऐरवी केरळमार्गे महाराष्ट्रात दाखल होणारे मान्सूनचे वारे यावेळी बंगालच्या उपसागरातून दाखल झाले त्यामुळे मुंबईआधी मान्सूनचे पूर्व विदर्भात 24 जुन रोजी आगमन झाले.मान्सूनचे आगमन झाल्याची खात्री हवामान खात्याने केली ना केली तोच आता या पावसामध्ये खंड पडणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. पावसामध्ये काही दिवसांचा खंड पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन आता करण्यात येत असले तरीही ज्या शेतकऱ्यांनी आधीच पेरणी करून घेतली त्यांनी सुध्दा आता योग्य नियोजन करून पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे.