नागपूर : नंदनवन हद्दीत आज सकाळीच दगडाने ठेचून हत्या केलेला एक तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. तातडीने उपनिरीक्षक आडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी नगर ते संघर्ष नगर रोड वर दारू भट्टीच्या समोर अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आल्याचे आणि ही घटना मध्यरात्री झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळाली.ऑगस्ट महिन्याचा पहिल्याच दिवशी हत्या झाल्याने पुन्हा एकदा नागपूर हादरले. गेल्या आठवड्यात चार हत्या एकाच दिवशी झाल्या. पोलीस तपासात मृतकाचे नाव तुषार किशोर इंगळे (18), रा.गुजर नगर, गंगाबाई घाट असे असल्याचे पुढे आले. हत्या कुणी व कशासाठी केली याचा मागोवा पोलीस घेत आहेत.