सोलापूर -भाजपचे नेते किरीट सोमय्यांविरोधात काँग्रेसने आक्रमक होत सोलापुरात आंदोलन केले
काँग्रेस भवन येथे जमून घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही प्रसारमाध्यमांनी त्याबाबत बातमी देखील प्रसिद्ध केली आहे.आक्रमक झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली.भाजपने तात्काळ सोमय्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली