
(Sangamner)संगमनेर: संगमनेर तालुक्याचा पठारभाग व याच पठारभागातील आंबीखालसा गावातील युवा शेतकरी शिवम भरत कहाने यांच्या राजा नावाच्या बोकडाला सध्या चांगलीच मागणी आहे. राजा या बोकडाला आज लाखोंची मागणी आहे. विशेष म्हणजे या बोकडाच्या कपाळावर मुस्लिम बांधवाचे पवित्र चिन्ह चांद तारा आहे त्यामुळे त्याची सर्व पंचक्रोशीत ऐकच चर्चा आहे.
या राजा नावाच्या बोकडाला कहाने हे शेंगदाना पेंड, गहु, गवत व अन्य खाद्य पदार्थ देत असतात. आज (Bharat Ramdas Kahane)भरत रामदास कहाने व त्यांचा मुलगा शेतकरी (Shivam Bharat Kahane)शिवम भरत कहाने आणि परिवार राजाची काळजी घेत आहेत. तो चोरी जाईल किंवा बिबट्याचा हल्ला होईल या भीतीने त्यावर लक्ष ही ठेवुन आहेत. राजाला जर चांगला भाव मिळाला तर आम्ही त्याची विक्री देखील करणार असल्याचे कहाने परिवाराने सांगितले आहे.