मुंबई- मराठा समाजाच्या लोकांना मराठवाड्यात गुपचूप सरसकट ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. अशा प्रकारे सुमारे २८ लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी दावा केला की, हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. एकीकडे सरकार जनतेला आपसात झुंजवत ठेवते आणि दुसरीकडे गुपचूपपणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचे काम करत आहे. या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. विशेषतः बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या लाटणाऱ्यांची एसआयटी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केलीी.
MAHARASHTRA
Artical Blog
Hindi News
















