नागपूर : ओबीसी समाजाच्या मागण्या तोंडींच जर मान्य करायच्या होत्या तर मग बैठक कशाला घेतली, हा फार्स होता, यामुळेच मी आणि अनेक आमदार गेलो नाही. तोंडी आश्वासनावर तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले, लेखीशिवाय माघार नाही म्हणणारे ओबीसी नेते तोंडी आश्वासनावर कसे काय समाधानी झाले, ओबीसींचे प्रमाणपत्र देणार नाही असे सरकार म्हणत असले तरी, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे मराठा आहेत. त्यांनी ओबीसींचे सर्टिफिकेट घेतले आणि व्हॅलिडीटी पण मिळाली, गेल्या काही वर्षात पैसे घेऊन जात प्रमाणपत्र देण्याचे काम झपाट्यानं सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.
– जळगावमध्ये कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली, आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे, चपराशी पासून इंजिनिअर पर्यंत संपूर्ण जागा कंत्राटी पद्धतीने भरणार आहे.मनुवादी लोक मोक्याच्या जागी आणून आरक्षण संपवल जाईल, या जीआरची होळी करा. ओबीसी एससी एसटी हा संपूर्ण कॅटेगिरीचा हक्क संपवणारा आहे. तरुणांनो सत्ताधाऱ्यांना गावात येऊ देऊ नका, हा जीआर बहुजनांना उध्वस्त करणारा आहे. धनगर आरक्षणाचा काय तोडगा निघाला माहित नाही, सरकार मूर्ख बनवत आहे, तरुणानं आवाहन करतो रस्त्यावर उतरा. रामाच्या नावावर निवडणुका तोंडावर आहेत म्हणून वेगवेगळे उपद्व्याप सुरू आहेत. भाजपसोबत सत्तेत असणारे पक्ष हे निवडणूक आयोग खिशात घेऊन फिरत आहे, दोन लोक जरी भाजप बरोबर जातील ,पक्ष आणि चिन्हाचा दावा केला तरी त्यात नवल नाही,
प्रभू रामचंद्र नावाने हा धिंगाणा भाजप खेळ खेळत आहे, तरुणांचा डोक्यात आग लावत आहे, नव्याने वाद पेटवायचा आहे, निवडणुका जिंकण्यासाठी हे सारे सुरू आहे. सत्तेसाठी लाचार झालेल्यांना दुसऱ्यांचं दु:ख किती कळतं हे मात्र कठीण आहे. उद्या सहा महिने मुख्यमंत्री, तीन महिने उपमुख्यमंत्री आणि एक महिना मंत्री असेही कंत्राटी पद्धतीने भरली जातील, 15 ते 20 टक्के विकण्याचे काम सुरू आहे. बोगस ओबीसी आहेत. नोकऱ्या बळकावनाऱ्यावर कारवाई करा, जाती निहाय जनगणना करा. 28 लाख मराठ्याना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले. मागील दीड दोन वर्षात हे काम झपाट्यानं झाल्याचा दावा केला. शिंदे गटाचा विरोधात जाणार असल्यानं निकाल लागत नाही आहे, जीवनदान देण्याचं काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातच न्याय मिळेल. कर्ज काढू शकत नाही, 8 लक्ष कोटींच कर्ज आहे, रोखे काढून कर्ज काढण्याच काम आहे, निराधाराना पैसे न देणारे सरकार आहे. यात बोगस प्रमाणपत्र कोणाला दिले याची एसआयटी चौकशी करा.सरकारला भीक लागली का? बेरोजगारांना फसवत आहे. खोके भरण्याचे काम सुरू आहे, बेरोजगार तरुणांचा पैश्यावर व्याज खाण्याची सवय झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे गटाला अपेक्षा आहे.
– माल कमवत जायचे, नाराज असल्याचे दाखवायचे ढोंग सुरू आहे, तीन पक्षाचे गोंधळी असून जनतेला खडा तमाशा दाखवू नका, कसली नाराजी, सारे राजकारण आहे, शिंदे सरकारचा बळी घ्यायची तयारी झाली आहे, गणेश विसर्जन झाले आता सरकार विसर्जनतयारी सुरू आहे. वेळीच निकाल लागला असता तर हे चित्र दिसले नसते, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.















