व्हायला हवा यावर विचार..
गेल्या महिन्यात बस स्टॅंड ते इंटर्नॅशनल-डोमॅस्टीक एअरपोर्ट्स, ( Stand to Internal-Domastic Airports ) सोशल मिडीया ते मेन स्ट्रीम प्रिंट व इलेक्त्रॉनिक मिडीया ( Social Media K Mainestream Print and Electronic Media) या सगळ्यांत एक जाहीरात व्हायरल केली गेली होती. आपण आत्तापर्यंत पाश्चात्य आणि भारतीय तथाकथित सेलिब्रेटी महिलांचे गर्भारपणातील बाहेर दिसणार्या पोटाचे फोटो पाहिले आहेत. त्या जाहीरातीत सनसनाटी हे होतं की त्या फोटोत पोट दाखविणारी बाई टर्न्ड पुरुष आपली उघडी छाती (ज्यावर स्तन नाहीत) आणि आपले बाहेर आलेले नवव्या महिन्यातील पोट दाखवते आहे आणि त्याला मागून त्याच्या पुरुष टर्न्ड बाईने (पार्टनरने) अतिशय प्रेमाने पकडले आहे. हे जोडपं केरळमधील असून त्यांची नावे जहान आणि जिया (Jahan and Jia) अशी आहेत. आज त्या फोटोतील गरोदर पुरुषाने एका मुलाला जन्म दिलेला आहे. यातून साध्य काय झालं? तर आपल्याकडे समाजात इतर महत्वाचे आणि अतिगंभीर प्रश्न असूनही ( LGBTQIA) या विषयाकडे समाजाचं लक्ष काही काळापुरतं खेचलं गेलं. मग त्याविषयी चर्चा होणं ओघाने आलंच.
एल जी बी टी क्यू आय ए (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर/क्वेश्चनींग, इंटरसेक्स, अॅलाईड/असेक्शुअल/अरोमॅंटीक/अजेंडर) याच्या व्याख्या भिन्न आहेत आणि संपूर्ण जगाची लोकसंख्या घेतली तरी या प्रत्येक प्रकारे विभागणी होत असलेल्या व्यक्तींचे जगभरातील प्रमाणही नगण्य आहे. ते प्रमाण वाढविण्यासाठी या लोकांसाठी काम करणार्या संघटना झटत आहेत. समाजाच्या स्विकारा आधी त्यांनी स्वत:चा स्विकार करणे गरजेचे आहे. यात कुटुंब संस्थाच सहाय्यभूत ठरते. कुटुंबातही याबाबत जागरुकता आणि आपल्या मुलाच्या/मुलीच्या मागे खंबीरपणे उभं रहाणं हे व्हायला हवं. पण या गोष्टी तितक्या सोप्या नाहीत.
मुळात माणसाचं मन इतकं गुंतागुंतीचं आहे की लहानाचे मोठे होत असताना समाजात आजूबाजूला, कुटुंबात जे अनुभव येत असतात त्याचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम मनावर होत असतो. मान्य की लिंग हे जरी शारीरिक वैशिष्ट्यांशी/ अवयवांशी जोडलेलं असलेलं तरी लैंगिकता ही मनाशी जोडलेली असते. पण आपल्या मनात उत्पन्न होणार्या विविध भावना या शरीरातील हार्मोन्सचा परिणाम असतो. मेंदू फक्त त्या भावना सर्व इंद्रियांपर्यंत पोहोचवतो. त्या हार्मोन्स मध्ये असंतुलन झालं की या भावनिक विश्वात उलटपालट होते. या हार्मोन्सची शरीरातील विविध ग्रंथींमध्ये होणारी नैसर्गिक निर्मिती हा एक महत्वाचा भाग आहे. जर जन्मत:च लिंगामध्येच गडबड झालेली असेल तर आणि जन्माला आल्यावर शरीरातील हार्मोन्स तयार करणार्या ग्रंथीच नीट कार्य करत नसतील तर जो काही गोंधळ उडतो तो निस्तरण्यासाठी वैद्यकीय मदतीचीच गरज लागते. पण अशा केसेस खूपच कमी असतात. इंटरसेक्स (यमध्ये बाह्य आणि आंतर्गत लैंगिक अवयव यात गडबड असते), असेक्शुअल (यात लैंगिक अवयवच नसतात) हे प्रकार यामुळे आलेले असतात.
ट्रान्सजेंडर हा अजुनच वेगळा प्रकार आहे. यामध्ये पुरुषाला आपण चुकीच्या शरीरात अडकलेली स्त्री आहोत असे वाटते आणि स्त्रीला आपण चुकीच्या शरीरात अडकलेला पुरुष आहोत असे वाटते. यामध्ये असे प्रकर्षाने वाटणारे लोक आपली लैंगिक शस्त्रक्रिया करुन घेतात. काहीवेळा पळवुन आणलेल्या मुलांना जबरदस्तीने अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते आणि ते ट्रान्सजेंडर बनतात.
जन्मत:च लिंग ठिक ठाक, ग्रंथी ठिक ठाक असलेल्या केसेसच अधिक असतात. अशांमध्ये जीवनातील घटनांचा, आजूबाजूच्या वातावरणाचा, कौटुंबिक वातावरणाचा परिणाम झाल्याने एखाद्याला आपल्या नैसर्गिक लिंगापेक्षा भिन्न लिंगी व्यक्तीबद्धल लैंगिक आकर्षण निर्माण होणे हा भाग मानसिक आहे. याचा जर खूप त्रास होत असेल तर हे समुपदेशनाने हाताळता येऊ शकते. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, क्वीअर हे प्रकार यातून आलेले असतात. यातही हार्मोनल असंतुलन अगदी बाळपणापासूनच असेल तर त्याचे परिणाम अधिकाधिक पक्के झालेले असतात. पण हे जीवनातील घटना, आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक वातावरण यामुळे असेल तर टेंपररी असू शकते.
यात समाजाने स्विकारणे हा भाग असला तरी सर्वात आधी आपण स्वत: जसे आहोत तसे स्वत:ला स्विकारणे हे महत्वाचे असते. यात कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. माझ्या अंदाजाने आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा होती तेव्हा सर्व प्रकारच्या व्यक्तींना सामावून घेतले जात असे. जसजशी एकत्र कुटुंबसंस्था विस्कळीत होऊन संयुक्त कुटुंब पद्धती आली तसतसे कुटुंबातील हे सामावून घेणे ही क्षमता कमी झाली. याचा परिणाम आपल्याला संपूर्ण समाजात दिसून येतो आहे. कुटुंबाने अशा व्यक्तीला स्विकारलं नाही तर समाज कसा स्विकारेल? मग समाज नियंत्रण ज्याच्याकडे आहे म्हणजेच कायद्याकडे हे सगळं निस्तरण्याची जबाबदारी येऊन पडते. कायदा म्हणजे त्यात कोरडेपणा आलाच.
२०१५ मध्ये कॅनडात टोरंटो CAMH च्या जेंडर डिस्फोरिया क्लिनीकचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. केनीथ झुकर (ज्यांची ३५ वर्षे या क्षेत्रात प्रॅक्टीस चालू होती) यांनी आपल्या ३५ वर्षाच्या प्रॅक्टीसमधुन एक अहवाल तयार करुन प्रसिद्ध केला. डॉ. झुकर हे LGBTQ च्या चक्रात अडकलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना समुपदेशनाची ट्रीटमेंट देत असत. त्यांच्या अहवालात असं समोर आलं की अशा मुलांमधील फक्त १% मुलांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. बाकीच्या ९९% केसेस या समुपदेशनाने यशस्वीरित्या हाताळल्या जाऊ शकतात. ज्या दिवशी हा अहवाल प्रसिद्ध झाला त्या रात्रीच डॉ. झुकर यांना CAMH ने Conversion therapy ची प्रॅक्टीस केली म्हणून निलंब्त केले आणि कॅनडीअन सरकारने त्यांची रवानगी तुरुंगात केली कारण कॅनडात Conversion therapy बेकायदेशीर आहे. Conversion therapy म्हणजे जे LGBTQ मध्ये मोडतात त्यांना समुपदेशन किंवा अन्य उपचार करुन हेट्रोसेक्श्युअल गटामध्ये रुपांतरीत करणे. कालांतराने डॉ. झुकर यांनी आपल्यावरील आरोप ्फेटाळले आणि CAMH ला त्यांची जाहीर माफी मागावी लागली.
पाश्चिमात्य देशांत लग्नाचे प्रमाण कमी आहे. त्यातही घटस्फोटांचे प्रमाण ५०% आहे. जे लिव्ह-इनमध्ये राहतात त्यातील फारच थोडी जोडपी दीर्घकाळ टिकतात. बाकीचे पार्टनर्स बदलत आपलं आयुष्य जगत राहतात. यातून निर्माण झालेली मुलं ही अनेकवेळा सिंगल पेरेंट किंवा पालकच नसल्याने फॉस्टर पेरेंट्कडे किंवा सरकारच्या ताब्यात जातात. तेथील कुटुंबसंस्था विस्कळीत झाल्याने तसेच एकल पालकत्वाचा ताण अशामुळे मूल वाढताना जे भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या सुरक्षित वातावरण मिळायला हवे ते मिळत नाही. जर पालकांचे पटत नसेल वारंवार वाद्विवाद होत असतील तर आई-वडील असूनही उपयोग होत नाही. मग अशी मुलं स्वत:कडे लक्ष खेचून घेण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं सनसनाटी करणं अशा मानसिकतेत असतात. यात काहींमध्ये मानसिक विकृती देखील निर्माण होऊ शकते.
अशातच काही शाळांमध्ये केजी पासून मुलांना लेंगिक शिक्षणाच्या नावाखाली LGBTQ च्या अवेअरनेसच्या नावाखाली पद्धतशीरपणे लैंगिकदृष्ट्या गोंधळात टाकण्याचं शिक्षण दिलं जातंय. यात केजी मधील मुलांना विचारतात, “तुला तू मुलगा/मुलगी की यातील कोणीच नाही असं वाटतंय?” त्यामुलाच्या उत्तरानुसार मग त्याला शाळेत त्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर करुन संबोधतात. उदाहरणार्थ एखादी मुलगी असेल आणि तिला हा प्रश्न विचारल्यावर जर तिने मुलगा असं उत्तर दिलं तर तिच्यासंदर्भात शाळेतील पूर्ण कम्युनिकेशन मध्ये “मस्क्युलाईन” सर्वनामांचा वापर केला जातो. तिने निवडलेलं सर्वनाम घरी पालकांपासून लपवुन ठेवलं जातं. यासाठी मानवाधिकार समित्यांनी पद्धतशीर मसुदे तौआरकरुन शाळांमध्ये दिले आहेत. केजी तील मुलांना गुड ट्च, बॅड ट्च हे शिकवणं गरजेचं आहे. पण अशा प्रकारे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण केल्यावर टीन एज मध्ये आल्यावर ही मुलं अचानक लिंगबदल आणि हार्मोनल ट्रीटमेंट करुन घेण्याचे, शस्त्रक्रिया करुन घेण्याचे जाहीर करतात. सगळ्याच शस्त्रक्रिया यशस्वी होतातच असे नाही. यातून जे फ्रस्ट्रेशन येतं त्याची परिणती मानसिक विकृती, डिप्रेशन आणि आत्महत्या यामध्ये देखील होऊ शकते. किंवा अशांच्या पालकांचाही विकृती/डिप्रेशन किंवा आत्महत्या असा प्रवास होऊ शकतो.
त्यामुळे सुदृढ कुटुंब व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी विवाहस्था टिकणं देखील गरजेचं आहे. लिव्ह-इन रिलेशन ला परदेशात कायद्याचे अभय आहे (म्हणजे अशा प्रकारच्या नात्यातून निर्माण होणारे प्रश्न, अशा नात्यात राहणार्या जोडप्यांचे हक्क यांना हाताळण्यास कायदा सक्षम आहे) तरीही तिथे देखील यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत….होत आहेत. भारतात तर लिव्ह-इन रिलेशनला जरी मान्यता असली तरी अजुनही त्यातून उद्भवणारे प्रश्न, अशा नात्यात राहणार्या जोडप्यांचे हक्क हाताळण्यासाठी आपले कायदे अजुनही सक्षम नाहीत.
कोणाचं लिंग जन्मत:च काय आहे? किंवा व्यवस्थित आहे ना? कुणाच्या ग्रंथी व्यवस्थित कार्य करत आहेत आणि कुणाच्या नाहीत? किंवा कुणाची लैंगिकता काय आहे? म्हणजे कोण कोणाकडे आकर्षिलं जातंय आणि कोण कोणाशी लैंगिक संबंध ठवतंय? ह्या बाबी अत्यंत खाजगी आहेत. लोक जेव्हा समाजात वावरतात तेव्हा सगळ्यांना माणूस म्हणून समान हक्क आणि समान कायदे असले पाहिजेत. त्यामुळे समाजात अशाही व्यक्ती असू शकतात आणि आपण अशांचा खुल्या मनाने स्विकार केला पाहिजे हे समाजाच्या मनावर बिंबवणं आणि त्याला कायद्याचे अभय देणं हे देखील गरजेचं आहे. पण म्हणून लहान मुलांच्या डोक्यात अत्यंत पद्धतशीरपणे तुझं लिंग वेगळं आहे असं घालणं आणि ते त्याच्या मनावर बिंबवणं अत्यंत चुकीचं आहे. आपल्या देशात एल जी बी टी लोकांना लिव्ह-इन मध्ये रहायला परवानगी आहे पण त्यांना कायदेशीर विवाह करण्यास परवानगी नाही. खरंतर अशांच्या विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्याने इतर वैवाहिक जोडप्यांप्रमाणेच त्यांनाही कायद्याचं संरक्षण सर्वच बाबतीत मिळेल.
मी एक स्त्री आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. पण एक माणूस म्हणून जेव्हा मी स्वत:चा विचार करते तेव्हा स्री असणं हा माझ्या व्यक्तीमत्वाचा एक छोटा भाग बनतो आणि त्या व्यतिरिक्तही माझ्याकडे अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत की जी मला माझी ओळख देतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मला मी एक स्त्री आहे अशीच ओळख नकोशी वाटते आणि गरजेचीही वाटत नाही. तसंच एखाद्या पुरुषाच्या बाबतीतही आहे. त्याची पुरुष ही ओळख त्याच्या व्यक्तीमत्वाचा एक छोटा भाग आहे. तसंच त्याला समाजही वागवतो आणि तो स्वत:ही वागतो. मग स्त्रिया आणि “इतर” (एल जी बी टी क्यू आय ए) यांबाबतीतही व्हायला पाहिजे. पण आत्ता सामाजिक जागृती याबाबत कमी पडते आहे. त्यामुळे हे “इतर” आणि काही प्रमाणात स्त्रिया देखील चळवळ उभारुन हक्कांची लढाई या मोडमध्ये गेलेले आहेत. समाजात फक्त जागृती आणि त्यांचा स्विकार यांचाच प्रसार गरजेचा आहे. लहान मुलांना केजी पासून तुझं लिंग काय आहे असं तुला वाटतं? हे विचारण्यात काय हशील?
एखादं सुंदर कापड असेल आणि त्याला भोक पडलं असेल तर आपण ते भोक शिवून बुजवतो ना की त्या भोकात बोटं घालून घालून ते मोठं करतो. असं बोट घालून भोक मोठं झाल्याने शेवटी ते कापड फाटते. “एल जी बी टी क्यू आय ए” यांच्या बाबतीतही नेमकं हेच होतंय. यामुळे त्यांचे प्रश्न सुटण्या ऐवजी अजुनच गडद होत चाललेत. आजकाल प्रसिद्धीसाठी, लक्षवेधून घेण्यासाठी जनता काहीही करते. केरळ मधील त्या जोडप्याने ज्या पद्धतीने आपले फोटो व्हायरल केले त्याची गरज नव्हती. यातून त्यांना प्रसिद्धी मिळाली इतकंच. ज्या तथाकथित पुरुषाने बाळाला जन्म दिला त्याचं लिंगं स्त्रीचंच आहे आणि म्हणूनच गर्भ धारणा करुन नऊ महिने तो ते आपल्या पोटात वाढवू शकला. फक्त एक सनसनाटी म्हणून त्याने आपले स्तन काढून टाकलेत. आता ज्यांना थोडंफार वैद्यकीय ज्ञान आहे त्यांना या सगळ्यातील गडबड आणि त्याचा हार्मोन्सच्या असंतुलनाशी असणारा संबंध समजेल. फोटोशूटसाठी आणि त्यातून मिळणार्या सवंग प्रसिद्धीसाठी त्या लोकांनी हे केलं. ज्यांना स्वत:चं नवव्या महिन्यातील उघडं पोट आणि उघडी छाती याचे फोटो व्हायरल करण्यास लाज वाटली नाही त्यांनी आपल्या जन्मलेल्या बाळाचं लिंग काय? त्याचे फोटो याला प्रसिद्धीपासून दूर का ठेवलं? प्रत्यक्षात या पुरुष बनलेल्या बाईने किती गोळ्या आणि इंजेक्षन्स घेतली आहेत आणि त्याचे तिच्या आरोग्यावर नक्की काय परिणाम झालेत याचेही रिपोर्ट्स व्हायरल केले तर यातील सत्य बाहेर येईल.
खूप काही लिहीता येईल. पण आता थांबते. मी या लोकांच्या विरोधात आजीबात नाहीये. पण याचा जो अतिरेक आणि बाजारूपणा चालू आहे त्याच्या विरोधात मी नक्कीच आहे. कारण हे मानवतेच्या विरुद्ध जातंय. या चळवळीतील लोकांना हे समजतंय का याची शंका वाटतेय. सध्याच्या जी२० आंतर्गत सी२० मधील “डायव्हर्सीटी, इनक्ल्युजन आणि म्युट्युअल रिस्पेक्ट” या वर्कींग गटाची मी एक सदस्य आहे आणि त्यातील एक सबथीम “एलजीबीटीक्यूआयए” या संदर्भात आहे. त्या सबथीमवर मी काम करतेय. म्हणून हा लेखन प्रपंच.
— डॉ. अपर्णा लळिंगकर
************************************************