
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती, खासदार नवनीत राणा ह्या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात याचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणाची खिल्ली उडवत त्यांना इशारा दिला,यावेळी सुषमा अंधारे कडून नवनीत राणा यांचा अक्का असा उल्लेख करण्यात आला, ईडी,सीबीआय,इलेक्शन कमिशनर यांना कामाला लावलं आहे त्याला उद्धव ठाकरे म्हणतात. नाद करायचा नाही. तर एवढे सगळे कामाला लागले असतानाही जो हटत नाही नरेंद्र मोदी व अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटते. आता उद्धव ठाकरेंवर बोलतांना टीका करताना नीट नीट ध्यानात ठेवायचं असा इशारा अंधारे यांनी नवनीत राणा यांना दिला यावेळी नवनीत राणा यांचे जुने व्हिडीओ सभेत दाखवत अंधारे यांनी राणा यांचा समाचार घेतला