
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
देश-विदेशातील विद्यार्थी होणार सहभागी
नागपूर, 15 डिसेंबर : लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची संघटना लिटाची ‘ग्लोबल अॅल्यूम्नी मीट : उडान- 2025-26’ चे शनिवार, 20 व रविवार 21 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देश-विदेशात विविध क्षेत्रांत एलआयटीचा नावलौकिक वाढवणारे माजी आणि विद्यमान विद्यार्थी हजेरी लावणार आहेत.
‘कनेक्टींग ड्रिम्स, इग्नायटींग सक्सेस’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘उडान 25-26’ चा 20 तारखेला एलआयटी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील स्व. रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेला सकाळी 10 वाजता माल्यार्पण शुभारंभ होणार आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता पर्सिस्टंट सिस्टीम, आयटी पार्क येथे माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
21 तारखेला सायंकाळी 6.30 वाजता पर्सिस्टंट हॉल, आयटी पार्क येथे ‘ज्वेल ऑफ एलआयटी’ व ‘युथ आयकॉन’ हा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री व एलआयटी विद्यापीठाचे संरक्षक देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोलार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल आणि एलआयटी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ गर्व्हनन्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणपती यादव हेदेखील यावेळी प्रमुख उपस्थित राहतील. तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता एलआयटी विद्यापीठाच्या सभागृहात सिल्वर ज्युबिली व गोल्डन ज्युबिली बॅचेसमधील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल.
नागपुरात १९४२ साली स्थापन झालेल्या एलआयटीमधून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक रासायनिक अभियंते आणि तंत्रज्ञ तयार झाले आहेत. अनेक एलआयटीयन्स भारतातील अग्रणी उद्योग क्षेत्रामध्ये तसेच, आंतरदेशीय कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापन पदांवर कार्यरत आहेत. सध्या एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेची (लिटा) सक्रीय संख्या जवळपास तीन हजारांवर आहे.
सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माधव लाभे, सचिव उत्कर्ष खोपकर, विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे व लिटाचे संरक्षक व एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी globallitalumnigmail. com वर मेल करावा किंवा उडान 24-25 चे आयोजन प्रमुख राकेश गुप्ता यांच्याशी 9422146107 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















