
जय महाराष्ट्र शासकिय निमशासकिय अधिकारी व कर्मचारी संघटनाचे राज्यअध्यक्ष व आक्रोश मोर्चा धरणे आंदोलनाचे नेतृत्व श्री अशोक डहाळे यांचे नेतृत्वात यशवंत स्टेडीयम, नागपूर येथे महाराष्ट्रातील हजारो लिपिक बांधव वेतन त्रूटी, पदनाम बदल, पदोन्नती टप्पा कमी करणे,कनिष्ठ सहाय्यक व वरीष्ठ सहाय्यक पदाचे एकत्रिकरण करा व जुनी पेंशन योजना जशास तशी लागु करा ,या विविध मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लिपीक बांधव हिवाळी अधिवेशन, आक्रोश मोर्चा धरणे आंदोलनात मोठया प्रमाणात सहभाग घेऊन आपली ताकद दाखवून दिली. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा व तालुक्यातील लिपिक वर्गीय संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्यामुळे स्टेडियमच्या परिसर भरून गेला. यावेळेस धरणे आंदोलनात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम, उमरगा विधानसभेचे आमदार, प्रवीण स्वामी, उस्मानाबाद विधानसभेचे आमदार कैलास पाटील घाडगे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.या वेळी हिवाळी अधिवेशनामध्ये कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक यांच्या वेतना मध्ये असलेली तफावत,वेतन त्रुटी व पदनाम बदल बाबत मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
जय महाराष्ट्र संघटना चंद्रपूर चे पालक अध्यक्ष महेश भुतेवार, जिल्हा अध्यक्ष गौरवकुमार पाटील, महिला जिल्हाध्यक्ष शाहिन शेख, उपाध्यक्ष,अरुणा उल्लीवार, समशेर पठाण, जिल्हा सचिव,धिरज पोटवार, संजू चांदेकर, कोषाध्यक्ष धनराज उपासे, मुल तालुका उपाध्यक्ष राजेश ठेंगणे, कार्याध्यक्ष, अविनाश महल्ले तसेच नीता ढाले, जयेश डांगे मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी लिपिक बांधवाणी कडकडीत बंद ठेवून न्याय हक्काच्या मागणीसाठी जिल्ह्या व तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व लिपीकवर्गीय बांधव धरणे आंदोलनात उपस्थित होते.




















