नागपूर बसस्थानकावर सापडला जिवंत बॉम्ब

0

NAGPUR नागपुरातील गणेशपेठ परिसरातील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकावर आज, बुधवारी दुपारी जिवंत बॉम्ब आढळून आला. गडचिरोली आगारातून आलेल्या बसमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. नागपूर बस स्थानकावर गडचिरोलीहून आलेल्या बसमध्ये (बस क्र. एमएच 40 वाय 5097) हा बॉम्ब ठेवला होता. संशयास्पद वस्तू बसमध्ये आढळल्यानंतर वाहकाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच स्थानिक पोलिस आणि बॉम्ब स्कॉडला कळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी यशस्वीपणे बॉम्ब निकामी केला.

NAGPUR बसस्टँडवर सापडलेल्या बॉक्समध्ये ज्वालाग्राही पदार्थ!