हा अपेक्षित निर्णय – देवेंद्र फडणवीस

0

 

नागपूर  NAGPUR – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिलेला हा अपेक्षित निर्णय असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर पाच प्रकरणात घेतलेली भूमिका, निवडणूक आयोगाची सातत्याने कायम अशीच भूमिका राहिलेली आहे. यामुळे आलेला निर्णय अपेक्षितच आहे .अजित पवार यांच्या अभिनंदनास त्यांच्या
नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस सरकारमध्ये राहुन प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला. शेवटी मेजॉरिटी जो निर्णय घेतो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो. पक्षाचे जे संविधान आहे, त्याचे किती पालन करण्यात आले? हे खूप महत्त्वाचे असते. बहुमताला महत्त्व आहेच, मात्र केवळ बहुमताच्या आधारावर हा निर्णय झालेला नाही. सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. पार्टीचे संविधान काय होतं? त्याचं किती पालन करण्यात आलं? निवडणुका झाल्या की नाही? पार्टी कोणाची आहे? अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यामध्ये झालेला आहे.
2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, त्यांना आज लोकशाही काय असते? हे समजले असेल. आज जे लोक लोकशाहीबद्दल ओरडत आहेत. त्यांनीच लोकशाहीचा मुडदा पाडला होता. लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असेच म्हणता येईल.