मराठी चित्रपटसृष्टीतील लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन

0

 

04MENT5 मराठी चित्रपटसृष्टीतील लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन

मुंबई, ४ मे  : मराठी चित्रपटसृष्टीतील लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर (४६) यांचे निधन झाले आहे. गेले काही महिने ते आजारी होते. त्यातच त्यांनी आज पहाटे चेंबूर घाटलागाव येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट उद्या (५ मे) प्रदर्शित होणार होता. पण त्याआधीच स्वप्नील यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मराठी पाऊल पडते पुढे हा स्वप्नील यांचा स्वतंत्र लेखक-दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होते.

स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. स्वप्निल यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटात अभिनेता चिराग पाटील, अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी काम केले आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. हा चित्रपट ॲक्शन, इमोशन्स, दर्जेदार संवाद आणि कथानकावर आधारीत आहे. चिराग पाटीलवर चित्रित झालेलेे “हाऊ पोऱ्या अनेर काठणा” हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.