शूटींग दरम्यान महानायक अमिताभ बच्चन जखमी, मुंबईला हलविले

0

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन हे हैदराबादमध्ये एका शूटींग दरम्यान जखमी झाल्याची माहिती आहे. शूटींगमध्ये त्यांच्या बरगड्यांना इजा झाली व त्यांना श्वास घेणेही कठीण होऊ लागल्याने त्यांना अॅम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात आले असून सध्या ते त्यांच्या जलसा येथील बंगल्यावर आराम करीत असल्याची माहिती आहे. बच्चन यांनी (Amitabh Bachchan injured during Film Shooting in Hyderabad) ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना चिंता वाढविणारी बातमी दिली आहे. प्रोजेक्ट के या चित्रपटासाठी महानायक अनेक दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करीत आहेत. शनिवारी दुपारी एका शॉटच्या दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. बच्चन यांची प्रकृती व्यवस्थित असून काही आठवडे त्यांना आराम करावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे की, हैद्राबादमध्ये मी प्रोजेक्ट के या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना एका अॅक्शन सीनच्या दरम्यान मी जखमी झालो. उजव्या बरगडीला गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे शूट रद्द करावे लागले. या घटनेनंतर हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करून घरी परतलो. सध्या विश्रांती घेत आहे. हालचाल आणि श्वासोच्छवास घेताना त्रास होत आहे. पूर्ण बरे व्हायला काही आठवडे लागतील. वेदना होत आहेत व त्यासाठी काही औषधे देखील घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आपण उपचार पूर्ण होईपर्यंत सर्व काम बंद केले आहे. मी जलसामध्ये विश्रांती घेत आहे आणि कामासाठी मोबाईलचा वापर करत आहे. मला आज संध्याकाळी जलसा गेटवर हितचिंतकांना भेटता येणार नाही. त्यामुळे कृपया येऊ नका, असे कळकळीचे आवाहनही बच्चन यांनी केले आहे. बच्चन यांचा हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीत रिलिज होणार आहे. यात प्रभास आणि दीपिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा