Microsoft System : जगभरातील 1 हजार विमाने रद्द बँक; टीव्ही चॅनेल, स्टाॅक मार्केटवरही परिणाम

0

Microsoft चे सर्व्हर ठप्प; Air India सह जगभरातील एअरलाईन्सना फटका, बँकिंग सेवाही विस्कळीत

मुंबई (Mumbai) : मायक्रोसॉफ्टची क्लाउड सेवा शुक्रवारी दुपारी विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील विमानसेवा आणि बँकसेवा ठप्प झाल्या आहेत. यामुळे भारत आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. जगभरातील बँकांपासून एअरलाइन्सपर्यंतच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट, आकसा या विमान कंपन्यांच्या विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. त्यासोबतच अनेक विमानतळांवरील सेवाही ठप्प झाली.(Microsoft Windows Crash)

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या फोर्मवर एक संदेश पिन करण्यात आला आहे. अनेक विंडोज वापरकर्त्यांना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) त्रुटी दिसत आहेत. क्राउडस्ट्राईक अपडेटनंतर ही समस्या येत आहे. यामुळे युजर्स त्रस्त झाले आहेत. मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली आहे. या समस्येमुळे लाखो वापरकर्त्यांवर मोठा परिणाम झाला आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.(Microsoft Faces Global Outage)

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस अपडेटनुसार, Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमधील बदलामुळे ही समस्या उद्भवली आहे. यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी कनेक्टिव्हिटी समस्या निर्माण झाली आहे.

या समस्येमुळे मायक्रोसॉफ्ट 365 सर्विसेस प्रभावित झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मायक्रोसॉफ्टसोबत काम करणाऱ्या CrowdStrike ने ही समस्या मान्य केली आहे. CrowdStrike ही सायबर सुरक्षा फर्म आहे. फर्मच्या अभियंत्यांनी समस्या निर्माण करणारा कंटेट शोधून काढला आहे आणि केलेले बदल परत हटवले आहेत.

CrowdStrike म्हणजे काय?

CrowdStrike ही एक सायबर सुरक्षा फर्म आहे जी कंपन्यांना त्यांचे IT वातावरण सुरक्षित करण्यात मदत करते. सोप्या शब्दात सांगायचे तर, कंपनी इंटरनेटच्या मदतीने कोणतेही काम करते, CrowdStrike त्यांना हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करते. हॅकर्स, सायबर हल्ले, रॅन्समवेअर आणि डेटा लीकपासून कंपन्यांचे संरक्षण करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. यामुळेच या कंपनीचे प्रमुख ग्राहक जगभरातील मोठ्या बँका, विद्यापीठे आणि सरकारी संस्था आहेत. अलीकडच्या काळात सायबर विश्वात खूप बदल झाले आहेत. हॅकर्सच्या वाढत्या हल्ल्यांमुळे, CrowdStrike सारख्या फर्मवर कंपन्यांचे अवलंबित्व वाढले आहे.

Microsoft Teams down in India
Microsoft Teams outage today
Microsoft Teams download
Microsoft outage today
Microsoft Teams login
Microsoft 365
Microsoft Office 365 outage today
Microsoft Teams outage map

वाघनख प्रदर्शन सोहळ्याचे दिमाखात उद्घाटन

पारंपरिक वाद्यांचा गजर अन् मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिक
प्रतापगडावर घडलेल्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या वाघनख प्रदर्शन सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. या शाही सोहळ्यापूर्वी साताऱ्यातील पोवई नाका येथे असलेल्या शिवमूर्तीला अभिवादन करून काढण्यात आलेली भव्य-दिव्य रॅली, शिवपराक्रमाच्या गगनभेदी गर्जना, पारंपरिक वाद्यांचा गजर अन् मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी शाहूनगरीत शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.
साताऱ्यातील संग्रहालयात शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक सुजितकुमार उगले, सहायक अभिरक्षक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.
—————-
महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम राखण्याचा काँग्रेसचा संकल्प

के सी वेणुगोपाल यांचा निर्धार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असल्याचा निर्धारही काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

——-
शरद पवारांना दिलासा
पिपाणी हे चिन्ह गोठावल्याचे आले समोर

निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठावल्याचे समोर आले आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यात आलं आहे. यासोबत फक्त तुतारी हे निवडणूक चिन्ह देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठावलं आहे .. गेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारी या चिन्हामुळे शरदचंद्र पवार गटाला मोठा फटका बसला होता, असा आरोप काही नेत्यांनी केला होता. या आरोपानंतर तुतारी सारखी दिसणारी निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठावण्यात आली आहे.
———

IPL मध्ये होणार मोठे फेरबदल
मुकेश अंबानी यांना गौतम अदानी देणार टक्कर
आयपीएलमध्ये दरवर्षी मोठे बदल होत आहेत. या लीगमध्ये जगभरातील अनेक खेळाडू खेळतात. य़ा लीगमध्ये हजारो कोटींची उलाढाल होते. अनेक मोठ्या उद्योगपतींनी आयपीएल संघावर पैसे लावले आहेत. आता अंबानी यांच्या नंतर अदानी यांची देखील आयपीएलमध्ये एन्ट्री होणार असल्याचं कळतं आहे.आयपीएलमध्ये सध्या १० संघ खेळत असून सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांचं मोठं मनोरंजन होत आहे. त्यातच आता पण पुढचा आयपीएल सीजन आणखी रंजक होणार असल्याचं कळत आहे. कारण आयपीएलमध्ये खेळाडूंसोबतच देशातील दोन बड्या उद्योगपतींमध्येही टक्कर पाहायला मिळणार आहे.
——–

जगातील सर्वात उंच ब्रीजवर भारतीय रेल्वे धावणार
20 वर्षांनी स्वप्न साकार

गातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे ब्रिजवर भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे.येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे ब्रिजवर भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे. सांगलदन ते रियासी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा भाग आहे.

——-

धोतर घातल्यामुळे शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये धक्कादायक घटना
पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकिट बूक केलं, पण मॉलमध्ये गेल्यानंतर धोतर घातल्यामुळे प्रवेश नाकारला गेला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना घडला आहे. धोतर घातलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकिट बूक केलं होतं. पण मॉलमध्ये पोहचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांना प्रवेश नाकारला. त्या शेतकऱ्याने धोतर घातले होते, त्यामुळे मॉलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्याशिवाय शेतकऱ्यांचं समर्थ करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी मॉलमध्ये आंदोलन केले. त्याशइवाय मॉलच्या मॅनेजमेंटला यासंदर्भात जाब विचारला.

——–
विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा उमेदवार जाहीर
राष्ट्रवादीचे ठरले तीन उमेदवार

रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन शरद पवारांनी केलं. या ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांना खाली बसवा असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे. अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांनी हे आवाहन केलं आहे.
——–

क्रिकेट खेळताना वीज पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
नागपूरच्या वाडीजवळील घटना
विजांचा कडकडाट सुरू असताना मैदानात जाऊन क्रिकेट खेळणे एका १६ वर्षीय मुलाच्या प्राणावर बेतले. वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शिवकुमार फकीरा सयाम (१६, महादेवनगर, लाव्हा, वाडी) असे मृतकाचे नाव आहे. शिवकुमार क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. तो अभिजीत सोसायटीतील टेकडी शिव मंदिरामागील मैदानात क्रिकेट खेळत असताना अचानक जोराचा आवाज करत वीज तो खेळत असलेल्या ठिकाणीच पडली.
———–

जगभरातील 1 हजार विमाने रद्द

बँक, टीव्ही चॅनेल, स्टाॅक मार्केटवरही परिणाम

भारतात, इंडिगो, स्पाईसजेट, आकासा एअर, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस या 5 एअरलाइन्सने या तांत्रिक समस्येमुळे त्यांचे बुकिंग, चेक-इन आणि फ्लाइट अपडेट सेवा प्रभावित झाल्याचे कळवले आहे.मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवांना शुक्रवारी अँटीव्हायरस ‘क्राउडस्ट्राइक’च्या अपडेटमुळे अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जगभरातील एअरलाइन्स, टीव्ही टेलिकास्ट, बँकिंग आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या अनेक देशांमध्ये 1 हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आणि 3 हजार विमाने उशिराने उडाली. भारतात, इंडिगो, स्पाईसजेट, आकासा एअर, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस या 5 एअरलाइन्सने या तांत्रिक समस्येमुळे त्यांचे बुकिंग, चेक-इन आणि फ्लाइट अपडेट सेवा प्रभावित झाल्याचे कळवले आहे. विमानतळावर सेवा मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

——

सरकारच्या कामाचं कौतुक

मनोज जरांगेनी दिली प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वाघनखं राज्यात आल्याने राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. सोबतच आपण देखील ही वाघनखं बघण्यासाठी साताऱ्याला जाणार असल्याची तयारी देखील दाखवली आहे.राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षीत वाघनखं अखेर साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडत आहे. ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल.

———-

परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार शिष्यवृत्ती

90 विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती

के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट ने के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत 90 हुशार, चुणचुणीत विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल.के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट ने के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत 90 हुशार, चुणचुणीत विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल.

——–

मुसळधार पावसामुळे दाणादाण

वर्ध्यात सकाळपासून अतिवृष्टी

हवामान विभागाने वर्धा जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आज सकाळपासून जिल्ह्याच्या आठ तालुक्यापैकी पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे हिंगणघाट तालुक्यातील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत, तर वर्धा – नागपूर महामार्गांवरील पवनार येथे पाणी साचल्याने वाहतूक बंद झालीय. सोबतच पिपरी येथील पुलाखाली सुद्धा पाणी साचले आहे.संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता पावसामुळे कोणतेही नुकसान होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.