मुंबई- महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहामध्ये नागरिकांची राष्ट्रभावना जागृत रहावी, यासाठी चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत ऐकवले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला देखिल स्वतःचे राज्यगीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात ‘ जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत लावले पाहिजे. अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
चित्रपटगृहातील चित्रपट कोणत्याही भाषेतला असो, प्रेक्षक कोणत्याही राज्यातला असो, पण ते जर चित्रपट महाराष्ट्रात पाहत असतील तर त्यांच्या कानावर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आपले राज्यगीत प्रत्येकाच्या कानी पडलेच पाहिजे, अशी महाराष्ट्र नव निर्माम सेनेची चित्रपटगृहांना सूचना करण्यात आली असल्याचे प्रवक्ते योगेश चिले यांनी स्पष्ट केले.