मुंबई- कोरोनाचा धोका आता तसा राहिलेला नाही. ही लाट ओसरत चालली आहे. येत्या 15 मे पर्यंत ही कोरोना लाट संपुष्टात येईल असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केला आहे. कोरोनाची आकडेवारी दररोजच्या दररोज कमी होत आहेत. बाराशे वरून हा आकडा साडेचारशे वर येऊन पोहोचला आहे. हा कोरोना व्हेरिएंट कमी तीव्रतेचा असल्याचेही सावंत यांनी सांगितले. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सावंत यांनी ही माहिती दिली आहे