मान्सूनचे १० जूनला महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागाचे संकेत

0

मुंबई : देशभरात मान्सूनची प्रतीक्षा सुरु असताना मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर महाराष्ट्रात १० जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Monsoon Update) मान्सून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचला असल्याची माहिती असून तेथून त्यांची दक्षिण भारताकडे आगेकूच सुरु आहे. सर्वप्रथम मान्सून केरळला धडकणार आहे. मौसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे. त्यामुळे मान्सून सोमवारपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मान्सूनची आगेकूच कायम राहिल्यास महाराष्ट्रात १० जूनला मान्सूनचे आगमन होऊ शकते, असे हवामान विभागाला वाटते. महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.