
NAGPUR नागपूर : नागभीडजवळ NAGDHID KAMPA काम्पा येथे भरधाव कारची खासगी बसला समोरून धडक बसून झालेल्या भीषण उपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी घडली. मृतांपैकी तिघे जण एकाच कुटुंबातील असून ते नागपुरातील चंदननगर परिसरातील रहिवासी होते. (Accident Near Nagbhid) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये रोहन विजय राऊत (वय ३०), ऋषिकेश विजय राऊत (वय २८), गीता विजय राऊत (वय ५०), सुनीता रूपेश फेंडर (वय ४०), प्रभा शेखर सोनवणे (वय ३५) आणि यामिनी फेंडर (वय ९, रा. नागपूर ) यांचा समावेश आहे. यातील रोहन विजय राऊत हे ब्रह्मपुरी तालुक्यात किन्ही गावात पत्नीला भेटण्यासाठी कारने जात होते.
ते शेजारी राहणाऱ्या रोशन तागडे यांच्या अल्टो कारने निघाले होते. नागभीडजवळ त्यांचीी भरदाव कार एका खासगी बसवर धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यात कारचा चक्काचूर झाला. घटनास्थळाजवळ असलेल्या बारच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले व त्यांना तातडीने रुग्णालयात रवाना केले. कारमधील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले.
काही मृतदेह कारचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात विजय राऊत, ऋषिकेश विजय राऊत, गीता विजय राऊत आणि सुनीता रूपेश फेंडर असे चौघे जण जागीच ठार झाले. प्रभा शेखर सोनवाणे आणि यामिनी फेंडर गंभीर हे जखमी होते. प्रभा सोनवाणे यांचा नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला तर यामिनी फेंडर हिला नागपूरला नेत असतानाच वाटेत तिचाही मृत्यू झाला. पोलिसांनी खासगी बसचालक राजेंद्र लाकडू वैरकर याला ताब्यात घेतले.