एमपीएससी चे विद्यार्थी पुन्हा आंदोलनात, आता वेगळेच कारण

0

पुणे (PUNE) : पुण्यात पुन्हा एकदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु झाले आहे. (MPSC Students agitation) आता आंदोलनाचे कारण वेगळे असून लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये आयोगाने केलेल्या बदलांना विद्यार्थ्यांचा विरोध आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरु आहे. लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क कौशल्य चाचणीबाबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थी आग्रही आहेत. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी जाहीर केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक परिक्षेसाठी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या कौशल्य चाचणीची शब्द मर्यादा जास्त आहे. विद्यार्थ्यांचा याला विरोध आहे. मराठीसाठी 30 साठी शब्दमर्यादा ही 120 ते 130 शब्द आहेत आणि इंग्रजीसाठी 210 ते 230 शब्द आहेत. याप्रमाणेच आयोगाने आमची कौशल्य चाचणी घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आयोगाला बदल करण्याचा निश्चितच अधिकार आहे. पण आमच्यावर जर अन्याय होत असेल तर ती मागणी आम्ही कोणाकडे करावी? असा प्रश्न देखील काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आता आयोगानं जे बदल केले आहेत ते मराठीसाठी 300 शब्द दिले आहेत. तर 400 शब्द इंग्रजीसाठी आहेत. ही शब्दमर्यादा दुपटीपेक्षा जास्त असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा