सुषमा अंधारे या नेत्याविरुद्ध दाखल करणार दावा

0

पुणेः शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबद्धल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता सुषमा अंधारे या आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात पुणे येथील न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. केवळ तीन रुपयांचा हा दावा असेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याबद्दल सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांनी चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले होते. अद्याप पोलिसांनी यावर कुठलाही अहवाल सादर केलेला नाही.

तपास सुरुच

संजय शिरसाट वक्तव्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासासाठी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. संजय शिरसाट यांच्या भाषणाची क्लीप तपासली जाणार आहे. विशेष म्हणजे आमदार शिरसाट यांच्या वक्तव्यातील ‘लफडं’ हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का, याचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिरसाट काय म्हणाले

दरम्यान, आमदार संजय शिरसाट आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. आपण सुषमा अंधारे यांच्याबद्दल एकही अश्लील शब्द बोललो नसल्याचा दावा त्यांनी केलाय. असा शब्द बोलल्याचे निदर्शनास आणून दिल्यास आमदारकीचा राजीनामा देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा