मुंबईच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षाचे गढूळ राजकारण

0

रोहित पवार यांचा गंभर आरोप


नागपूर. मुंबईच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी गढूळ राजकारण करीत आहे आणि बिहारी लोकांचे मत आपल्याला मिळावेत यासाठी सरकारचा सर्व प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली.
सत्ताधारी आमदारच विधानसभेच्या अध्यक्षांसमोर जाऊन आंदोलन करीत आहे, यावरून हा प्रश्न उपस्थित होतो की, सरकारचे काम नेमके कसे सुरू आहे? ज्या मुलीचा मृत्यू झाला तिच्या आई-वडीलांनी सरकारला कळकळीची विनंती केलीये तरीही हे जुने प्रकरण उकरून काढण्यात येत आहे. बिहारच्या निवडणुका असताना भाजपला त्याचा फायदा व्हावा यासाठी तेव्हाही सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा असाच फायदा घेण्यात आला होता. तर, आता मुंबईच्या निवडणुकांमध्ये बिहारी लोकांचे मत त्यांना मिळेल, या मत्वकांक्षेतून असे राजकारण करण्यात येत असल्याची अशी टीका पवार यांनी केली.
आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सभागृहात त्यांच्याच अध्यक्षांसमोर गोंधळ घालत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. ते ही एकदा नव्हे तर पाच-पाच सहादा त्यांनी आंदोलन केलं. आम्हा सर्वांना लोकहिताचे प्रश्न तेथे मांडायचे होते. परंतु, ते प्रश्न मांडत असताना हे सरकार अडचणीत येईल असे त्यांना वाटत असावे, म्हणून त्याबतीतली चर्चा होऊ नये म्हणून त्यांनी असा प्रयत्न करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला, असे पवार म्हणाले.