मुंबईचे माजी महापौर महाडेश्वर यांचे निधन

0

मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे मंगळवारी रात्री (Vishwanath Mahadeshwar) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्वर यांची तब्येत ठिक नव्हती. काही दिवसांपूर्वीच ते कणकवली गावाहून मुंबईला पोहोचले होते.
महाडेश्वर 2017 ते 2019 काळात मुंबईचे महापौर होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मतदार संघ आहे.