नागपूर. पोलिसांचा वचक संपल्यामुळे नागपुरात (Nagpur) गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्यामुळे नागपुरात गुंडाराज (Gundaraj) सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. गत वर्षातील गुन्हेगारीसंदर्भातील आकडेवारी सादर करीत पोलिस आयुक्तांनी (Commissioner of Police) गुन्हेगारीत घट आल्याचा दावा केला होता. पण, यंदा नवीन वर्षाची सुरुवातच हत्याकांडाने झाली. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दर दुसऱ्या दिवशी एक हत्याकांड घडत असल्याने उपराधानीतील नागरिक दशहतीत जगत आहे. मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटून आलेल्या एका कुख्यात गुंडाने आपल्याच मित्राची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली (Murdered by gangster). बुधवारीसुद्धा मध्यरात्रीच्या सुमारास अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गेल्या १० दिवसांतील उपराजधानीतील पाचवे हत्याकांड आहे. विक्की चंदेल असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर राकेश पाली असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश पाली आणि विक्की चंदेल दोघेही पक्के मित्र होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही मिळून प्रतिस्पर्धी टोळीतील युवकाचा खून केला होता. त्या हत्याकांडात दोघेही मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. ते गेल्या काही दिवसापूर्वीच कारागृहातून पॅरोलवर सुटून आले होते. दोघांनाही दारुचे जबर व्यसन होते. दोघेही मिळूनच अनेकदा दारू ढोसायचे. पण, विक्कीने गेल्या आठवड्यात राकेशचा भाचा शुभम याला शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. त्याने मामा राकेशकडे तक्रार केली. त्यामुळे चिडलेल्या राकेशने विक्कीचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी रात्री बारा वाजता पार्वतीनगरात विक्की चंदेल याला राकेशने बोलावले. विक्की पोहोचताच तेथे राकेशने साथिदारांच्या मदतीने त्याला घेराव घातला. काही कळण्यापूर्वीच तलवार-चाकूने सपासप वार करीत त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोखविले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून शुभम भांजा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.गुन्हेगारी कारवायांना अटकाव घालण्यासाठी पोलिस दलाकडून जीवाचे रान केले जात आहे. यानंतरही उपराजधानीत खुनाचे सत्र सुरू आहे. अगदी छोट्या –छोट्या कारणांवरून खून केले जात आसल्याने चिंता वाढली आहे.
कारागृहातून बाहेर येताच कुख्यात गुंडाकडून हत्याकांड
सततच्या खूनसत्राने उपराजधानी हादरली
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा