दुर्मीळ प्रजातीच्या कासवांची विक्री
मोर्शीत आठ, मध्य प्रदेशातून ११ कासव जप्त

0

मोर्शी. शहरातील जलपरी एक्वेरियम नामक दुकानातून मोर्शी वनविभागाने (Morshi Forest Department) गोपनीय माहितीवरून धाड टाकून दुर्मीळ प्रजातीचे आठ कासव (rare turtles) जप्त केले. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील बैतूल (Betul in Madhya Pradesh) येथून याच दुर्मीळ प्रजातीचे ११ कासव असे एकूण १९ कासव जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात प्रथम सचिन द्रुपालराव रवाळे (३५) रा. मोर्शी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आदित्य अरविंद भुसारी (२४) रा. आठनेर, जि. बैतूल याला ताब्यात घेतले. त्याने कासव पलाश हरीश तायवाडे रा. बैतूल, मध्य प्रदेश याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. पलाशकडे ग्राहक बनून वनविभागाचे कर्मचारी गेले आणि पलाशचा भाऊ रिषभ तायवाडे (३०) याला दुर्मीळ प्रजातीच्या ११ नग कासवासह अटक केली.

चौथ्या आरोपीला मुंबईतून अटक
प्रकरणातील चौथा आरोपी पलाश हरीश तायवाडे याला मुंबई येथे अटक करून ताब्यात घेतले असल्याचे येथील वनअधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान एकूण १९ कासव, प्राण्यांची तस्करी व अवैध वाहतुकीकरिता वापरलेल्या तीन मोटारसायकल व तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले.
मुख्य वनरक्षक अनारसे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. मोर्शीतील ज्या ग्राहकांनी कासवाची खरेदी केली आहे, त्यांनी ते नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी केले. सचिन रवाळे याचा व्यवसाय २०१९ पासून सुरू असल्याची तसेच हे कासव हे पश्चिम बंगालमार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात तस्करीच्या माध्यमातून आणले असल्याची माहिती पुढे आली आहे.

पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात गुरुवारी वाघाचा संशयास्पद मृत्यू उघडकीस आला. प्रथमदर्शनी तो वाघच असल्याचा विश्वास वनखात्याला असला तरीही शरीर पूर्णपणे सडलेले असल्याने त्याची खात्री करुन घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पवनी बफर क्षेत्रातील सिल्लारी बीटमधील कक्ष क्र. २५६ च्या संरक्षित जंगलातील कोडू तलावात वाघाचा मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांनी ही माहिती वनखात्याला दिली. हे ठिकाण पूर्व पेंच्या कक्ष क्र. ५६८ ला लागून आहे. वाघाचे शरीर पूर्णपणे सडलेले असून शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी केले जाणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाच्या मानक कार्यपद्धतीनुसार राज्य व्याघ्र संरक्षण दलाची चमू आणि श्वानपथक परिसरात शोध घेत आहे.

पावभाजी आणि कडबोळी | Kadboli -secret reciepe, Pavbhaji Recipe |Shankhnaad Khaddya Yatra Ep.no. 71