नागपूर : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि समस्त भारतीय जीवन दर्शन, संस्कृति आणि सभ्यताचा विश्वपटलावर आपल्या ओजस्वी विचाराने प्रसार करुन भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलविण्यास भाग पाडणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊं व स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने व मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी राजमाता जिजाऊं व स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.
तसेच मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये राजमाता जिजाऊंच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वामी विवेकानंद यांना जन्मदिन निमित्त अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक स्थळी स्वामी विवेकानंदांच्या ध्यानस्थ पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहा.जनसंपर्क अधिकारी अमोल तपासे, कैलाश लांडे, शैलेष जांभुळकर, राजु मेश्राम, निमजे व अग्निशमन विभागाचे शिंदे आदी उपस्थित होते.