तळोधी. जंगलांमध्ये जगण्यासाठीचा संघर्ष अविरत सुरू असतो. स्वतःचे पोट भरण्यासोबतच इतरांचे भक्ष ठरणार नाही, याची काळजी घेत वन्यप्राण्यांचे विचरण सुरू असते. अस्तीत्वासाठी वन्यप्राण्यांमधील झुंज नेहमीचाच प्रकार आहे. त्यातही कोणताच वाघ आपल्या सीमेत अन्य वाघ किंवा आव्हान ठरेल अश्या प्रण्याचे अस्तीत्व खपवून घेत नाही. त्याचाच प्रत्यय तळोधी – बाळापूर वनपरिक्षेत्र (Talodhi – Balapur Forest Zone ) अंतर्गत येणाऱ्या गोविंदपुर क्षेत्रातील, येनोली माल बिट, कक्ष क्रमांक 65 येथे आला. या भागात वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना (leopard is killed in a fight with a tiger) उघडकीस आली आहे. तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील येनुली मालचे वनरक्षक पी.एम. श्रीरामे हे गस्तीवर असताना सकाळी १०:३० वाजता येनोली माल बिट कक्ष क्रमांक 65 येनूली माल हद्दीत अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. वाघाच्या हल्यात बिबट मारल्या गेल्याचा प्रथमिक अंदाज आहे.
घटना उघडकीस आल्यानतर सकाळी घटनास्थळी मौका पंचनामा करून मृत बिबट तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील रोपवाटिकामध्ये आणून, शव विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नियमानूसार दहन करून विबट्याचा मृतदेह नष्ट करण्यात आला. यावेळी पशुधन विकास अधिकारी ममता वानखेडे, नागभीड आणि पशुधन विकास अधिकारी एस. बी. बनाईत तळोधी बा., यांनी शवविच्छेदन केले, यावेळी मृत बिबट्याचे काही आंतरावरील अवयवांचे नमुने गोळा करण्यात आले. ते पुढील तपासण्यांसाठी पाठविण्यात येणार आहे.
यावेळी के. आर. धोडने, सहाय्यक वन संरक्षक, वन विभाग ब्रह्मपुरी, एस. बी. हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड, एफ. बी. वाळके क्षेत्र सहाय्यक तळोधी बा., आर. एस. गायकवाड क्षेत्र सहाय्यक गोविंदपूर, विवेक करंबेकर मानद वन्यजीव रक्षक ब्रह्मपुरी, यश कायरकर वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष स्वाब नेचर केअर संस्था, जिवेश सयाम, प्रशांत सहारे, स्वाब संस्था सदस्य, तळोधी बा, वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनरक्षक कर्मचारी उपस्थित होते.
वाघासोबतच्या झुंजीत बिबट्या ठार
तळोधी वनपरिक्षेत्रातील घटना
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा