नागपूर: दक्षिण नागपुरातील मानेवाडा रिंगरोड महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरीच्या वतीने किशोर पवार यांच्या अध्यक्षतेत राजमाता, माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे गजानन शेळके व दक्षिण नागपूर भाजपचे वार्ड अध्यक्ष (क) बाबारावजी तायडे यांच्या हस्ते माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. डेअरीचे मालक किशोर पवार यांनी जिजामातांनी शहाजी राजे यांच्या खांद्याला खांदा लावून परकीय आक्रमणांना तोंड दिले यासह विविध प्रसंग सांगितले. माँ जिजाऊ पराक्रमी, धाडसी, स्वाभिमानी आणि जनतेच्या उद्धाराकरिता, राजसत्ता मिळविण्याकरिता शोषित, पीडित, समाजाला न्याय देण्याकरिता, जिजामातेने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. म्हणूनच राजमाता राष्ट्रमाता ठरल्यात यावर पवार यांनी भर दिला. यावेळी गजानन शेळके, किशोर पवार, गजानन गायकवाड, दीपक खेडकर, बाबाराव तायडे, देवराव प्रधान, प्रशांत पवार, आशिष काळे, विजय पवार, शाहू पवार, सुभाषराव माने, मोतीराम सिरसाम, लविश बिनेवाले, हेमंत वाघाडे, चंदूमामा व दिनकर गोतमारे, राजु वाघाडे, मडावी साहेब तसेच शिवशक्ती महिला मंडळामध्ये चंदा किशोर पवार, सही पवार, संचिता बेसरवार, ज्योती गायकवाड, साक्षी हिंगे, मंजू कांदे, सुवर्णा नंदुरकर, मंजुषा गायधने, ज्योती शेलोडे, कविता आष्टीकर, निकिता जाधव, अनिता वाघाडे, हर्षा माने आणि अबोली घडोले यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.