नागपूर. कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी सुमारास नागपूरजवळील कळमना रेल्वे स्थानकाजवळ (Kalmana railway station near Nagpur) घरसली. गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या यामुळे नागपूर ते हावडा रेल्वे मार्गावर (Nagpur to Howrah railway line) ही घटना घडली. सुरक्षिततेची उपायोजना म्हणून रेल्वेगाड्या काही मिनिटांसाठी ठिकाठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना काहीकाळ गैरसायींचा सामना करवा लागला. मात्र, लवकरच मार्ग सुरू करून प्रवासी गाड्या सोडण्यात आल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) नागपूर विभागाकडून सांगण्यात आले. अनेक प्रवासी रेल्वेगाड्या तासन् तास विलंबाने धावनत आहे. मात्र, त्यासाठी मालगाडीचे डिरेलमेंट कारणीभूत नसून उत्तर भारताकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या धुक्यामुळे उशिरा धावत असल्याचे मध्य रेल्वेच्या (CR) नागपूर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. रेल्वेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा घेतून कोराडीत वीजप्रकल्पाकडे निघालेल्या मालागाडीचे दोन व्हॅगन (वाघिनी) रुळाखाली आल्या. दोन्ही वॅगन तातडीने वेगळे करण्यात आले. दरम्यान हे काम सुरू असताना इतर रेल्वे मार्ग बाधित होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे नागपूर ते हावडा मार्गावरील रेल्वेगाड्यांना फारसा विलंब झाला नाही. मालगाडी घसरल्याने कोणत्याही प्रवासी रेल्वेगाड्यांवर परिणाम झालेला नाही. केवळ कोराडी वीज प्रकल्पाकडे जाणारा रेल्वे मार्ग बाधित झाला, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर भारताकडून येणाऱ्या आणि तिकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या दहा ते १५ तास विलंबाने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि बच्चेकंपनीची सर्वाधिक अबाळ सुरू आहे. रात्री आणि पहाटेच्यावेळी प्रवासी थंडी घालविण्यासाठी शेकोटीचा आधार घेत असल्याचे रेल्वेस्थानकावर दिसून येत आहे. प्रतीक्षलय आणि फलाटावर गार वाऱ्यांमुळे हैराण होणारे प्रवासी अशोशाचा जागा शोधून तिथेच बस्थान मांडत असल्याचे दिसते. नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच रेल्वेस्थानकांवर हेच चित्र दिसते आहे.छत्तीसगढ़ (GPCK) से कोराडी के लिये कोयला से भरी एक 58 डिब्बे वाली माल गाड़ी के 4 डिब्बे आज दिनांक 12-01-2023 को करीब 13.15 बजे कलमना यार्ड के पास पटरी से उतार गई। साथ ही सूचना मिलते ही दुर्घटना राहत गाड़ी को मौके पर भेजा गया है जो ½ घंटे के भीतर इतवारी से दुर्घटना रिलीफ ट्रेन घटना स्थल में पहुँच गई वहीं श्री मनिन्दर उप्पल –मण्डल रेल प्रबन्धक सहित संबन्धित अधिकारीगण भी मौके पर रिस्टोरेशन के लिए घटना स्थल पहुंच गए। रिस्टोरेशन कार्य युद्ध स्तर जारी है।