नामस्मरण-एक अद्भुत साधना

0

 

लेखांक १

नमस्कार,ब-याच दिवसांनी मी आपल्या भेटीला आले आहे.मध्यंतरी दुस-या विषयांवर लिखाण चालु होते.नामस्मरणावर ३ वर्षांपुर्वी मी एक लेख लिहिला होता.त्यानंतर अनेकांनी मला शंका विचारल्या.त्यांना मार्गदर्शन करत होतेच,पण एकेकाला सांगण्यापेक्षा आपणच या विषयावर का लिहु नये,हा विचार मनात घोळु लागला.मनाची सारखी चलबिचल होऊ लागली.या विषयावर लिहिण्या इतकी आपली पात्रता आहे का,याविषयी मनात संभ्रम होता.ज्यांना मार्गदर्शन केले,त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मनातल्या शंका-कुशंकांना पुर्णविराम मिळाला.माझा स्वत:चाही नामस्मरणाचा अनुभव होताच!!मग माझं ठरलं तर…लिहायचंच!!!

 

नामस्मरणावर आत्तापर्यंत अनेक संतांनी प्रवचने दिली आहेत,पण सर्वात भरीव प्रचार गोंदवलेकर महाराज,के.वि.बेलसरे गुरुजी,सद्गुरु वामनराव पै या त्रयींनी केला.या सर्वांची पुस्तके वाचुनही मला नामस्मरण नक्की कसे करावे,याची नेमकी दिशा सापडत नव्हती.अचानक वाचनालयात रा.कृ.कामत यांचं नामजपाचे महत्त्व हे पुस्तक सापडले.मी ते एका बैठकीतच वाचुन काढले आणि मला या विषयाची नेमकी दिशा सापडली.हो,करायचंच नामस्मरण…ठरलं आपलं!!मनाशी एक निर्धार केला आणि नामस्मरणाला सुरुवात केली.करायला काय हरकत आहे??जमलं तर जमलं,नाहीतर सोडुन दिलं…इथपासुन सुरु झालेला हा प्रवास नाही,आत्ता मेले तरी नाम घेणं सोडणार नाही,इथपर्यंत कधी येऊन ठेपला..माझं मलाच कळलं नाही!!!आत्ता तर नाम श्वासात भिनलंय.सकाळी उठल्यावर पहिलं तोंडात नामच येतं.अनेक चमत्कार अनुभवले.या प्रवासात जोडीला अनेक साधनाही केल्या,त्यात नामस्मरण ही नंबर वन साधना आहे,याबद्दल खात्रीच पटली.तर करुया आपण नामस्मरणावर चर्चा!!!

-वैद्य.वर्षा लाड.