आम आदमी पार्टीची दिल्लीत बाजी, नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव

0

नागपूर मनपाही ताब्यात घेणार- डॉ देवेंद्र वानखेडे

नागपूर:आम आदमी पार्टीने दिल्लीत बाजी मारल्यानंतर आज नागपुरात ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता नागपूर महापालिकेतही आप आपला झेंडा रोवणार असल्याचा निर्धार विदर्भ अध्यक्ष डॉ. देवेंद्र वानखडे यांनी बोलून दाखविला. यावेळी प्रामुख्याने राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, संयोजक कविता सिंगल, उपाध्यक्ष डॉ जाफरी ,संघटन मंत्री शंकर इंगोले, सचिव भूषण ढाकूलकर, युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आम आदमी पक्षाने दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी निवडणूक) शानदार कामगिरीसह बहुमत मिळविले. गेल्या १५ वर्षांपासून दिल्ली एमसीडीवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र यावेळी आम आदमी पक्षाने ही सत्ता खेचून आणली. भाजप दुसऱ्या क्रमांकावर, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपच्या 134 उमेदवारांनी विजयाची नोंद केली आहे. भारतीय जनता पक्षाने 104 जागा जिंकल्या काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या. जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत. यावेळी रोशन डोंगरे, अजय धर्मे, आकाश कावळे, मनोज डफरे, श्याम बोकडे, मयंक यादव, गौतम कावरे, प्रदीप पौनिकर, अमेय नारनावरे, नरेश महाजन, संतोष वैद्य, विनोद आलमडोहकर, सोनू फटीग, सुनिल मथ्यु,   जॉय बांगलकर, अलका पोपटकर, अभिजित झा,   विशाल वैद्य,  प्रतिक बावनगडे, सौरभ दुबे, तेजराम शाहू, दिपक भातखोरे, हरीश वेलेकर,  पंकज मेश्राम, शुभम मोरे, पुष्पा डाभरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा