नागपूरकरांना पुन्हा दामदुप्पट योजनेची भूरळ

0

ताजबाग भागात सुरू आहे ‘स्किम’ : गुंतवणुकदारांची रिघ

नागपूर. गत काही दिवसांपासून मोठा ताजबाग परिसरात (Bada Taj Bagh area) पैसे गुंतवा आणि महिनाभरात दुप्पट मोबदला (Double scheme ) घेऊन जा, अशी स्किम चालविली जात आहे. त्याला मोठा प्रतिसादही मिळतो आहे. गुंतवणूकदार चक्क पैसे घेऊन रांगा लावत आहेत. ही स्किम चालविणाऱ्यांचे एजंटही हसनबाग आणि ताजबाग परिसरात फिरून नागरिकांना गुंतवणूकीसाठी आकर्षित करीत आहेत. शेकडो लोकांनी या योजनेत लोखोंची गुंतवणूक (investment of millions ) केली आहे. आता शहरातील इतर भागात राहणारे लोकही या योजनेत पैसे गुंतवित असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी नागपूरसह देशाच्या विविध भागांत लेाकांना आकर्षित करणाऱ्या अशा योजना पूर्वीही सुरू झाल्या होत्या. कोट्यवधी रुपये बुडवून योजना चालविणारे फरार झाले आहेत. याप्रकाराची साऱ्यांनाच जाणीव आहे. त्यानंतरही झटपट दुप्पट पैसा मिळविण्याच्या लोभात लोकं पैसे बुडण्याची जोखीम स्वीकारून गुंतवणूक करीत आहेत.

बालाघाटशी जुडले आहेत तार

महिनाभरातच पैसे दुप्पट करणाऱ्या या योजनेचे तार बालाघाटशी जुडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच रियाज अंसारी आणि राकेश तिवारी नावाच्या व्यक्तीने मोठा ताजबाग परिसरात ही योजना सुरू केली. मोठा ताजबाग परिसरातच सक्रिय दिलीप ऑटोवाला, अप्पू, बब्बू चिरौंजीवाला आणि फहीमसह अर्धा डझन लोकांना एजंट नियुक्त केले. या लोकांनी परिसरात योजनेचा जोरदार प्रचार-प्रसार केला. सुरुवातीला लोकांनी 10-20 हजार रुपये गुंतविले. पुढच्याच महिन्यात त्यांना दुप्पट पैसे मिळाले. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. कमितकमी 2 हजार लोकांनी या येाजनेत 50 हजारापासून 20 लाख रुपयांपर्यंत जमा केल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत तरी लोकांना महिनाभरात दुप्पट पैसे मिळाले आहेत, मात्र पैसे दुप्पट कसे होत आहेत हा तपासाचा विषय असू शकतो. विशेष म्हणजे योजना चालवणाऱ्यांनी सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

सर्व व्यवहार कच्च्यात

या योजनेत पैशांचा सर्व व्यवहार कच्च्यात होतो. त्यासाठी मोठा ताजबाग परिसरातील ठाकूर प्लॉट आणि सरायजवळ स्टॉलही लावण्यात आले आहेत. दररोज या स्टॉलवर लोक रांग लावून पैसे जमा करीत आहेत. दर गुरुवारी लोकांना पैसे वाटप केले जातात. गुंतवणूक करणाऱ्यांना एक कच्ची पावती दिली जाते. रजिस्टरवर त्यांच्या नावाची नोंद होते. काही दिवसातच गुंतवणूकदारांची संख्या इतकी अधिक वाढली आहे की, पैसे मोजण्यासाठी मशीन लावण्यात आल्या. एक स्टॉल हसनबाग चौकातही सुरू करण्यात आला होता. हा स्टॉल शहरातील खतरनाक गुंड मोठा समशेरच्या देखरेखीत चालवला जात होता. इतरांप्रमाणे समशेरही एजंट बनला होता. त्याच्याकडेही शेकडो लोकांनी पैसे गुंतविले आहेत.

शहर पोलिस लागले कामाला
या योजनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला कामावर लावले आहे. सांगण्यात येते की, गुप्तरित्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. ताजबाग आणि हसनबाग परिसरात पोलिस सक्रीय झाल्याने खळबळ उडाली आहे. या योजनेबाबत कोणीही काही बोलायला तयार नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरसह काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र कोणीही या योजनेमागे कोण आहे हे सांगण्यास तयार नाही.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा