नागपूर. एसटी महामंडळाकडून (ST Corporation) 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी (Nagpur to Shirdi ST) या समृद्धी मार्गावर शयनआसनी वातानुकूलित बससेवा (Air-conditioned sleeper bus service on Samriddhi route) सुरू करण्यात येत आहे. यासेवेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. रात्री 9 वाजता एकाचवेळी दोन्ही बाजुने बसेस सोडण्यात येतील. यासाठी आगारात शिवशाही बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सीमेंट रोडने बसेस धावणार असल्याने नवे टायर बसविण्यात आले आहे. शिवाय पहिल्याच फेरीत विघ्न येऊ नये, यादृष्टीने बसेसची चाचपणीही केली गेली आहे. या सेवेसाठी यासाठी तेराशे रुपये प्रवासभाडे आकारले जाणार आहे. नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात आलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा झाला. सदर मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी महांडळाकडून गुरुवारपासून बससेवा सुरु होत आहे.
नागपूर- शिर्डी बसमध्ये 30 आसने बसण्यासाठी उपलब्ध असून, 15 शयन आसने आहेत. नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणांहून दररोज रात्री 9 वाजता बस सुटेल. पहाटे 5.30 वाजता संबंधित ठिकाणी पोहाचणार आहे. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 किमी व वेळेमध्ये 4.15 तासांची बचत होणार आहे. यासाठी प्रौढ व्यक्तिस 1300 रुपये व मुलांसाठी 670 रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठांना तिकिट दरात शंभर टक्के तर तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50 टक्के सवलत असणार आहे.
याशिवाय नागपूर ते औरंगाबाद (जालनामार्गे ) या मार्गावरही समृध्दी महामागार्र्व्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10 वाजता सुटणार आहे. व जालना मार्गे पहाटे 5.30 वाजता पोहोचणार आहे. बससेवेमुुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 कि. मी. व प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होणार आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे