बुलडाण्यात आश्चर्यजनक घटना ; वाचा नेमका प्रकार काय?
बुलडाणा. जिल्ह्यात एका मृतदेहाचा अंत्यसंस्कारावेळी धर्म बदलल्याची (Religion changed during cremation ) आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. मुस्लिम पद्धतीने (Muslim ) होणारे सोपस्कार थांबवून मृतदेह पुन्हा एकदा पोलिसांना सुपूर्द केला आणि त्यानंतर हिंदू पद्धतीने अनोळखी मृतदेहावर कायदेशीर अंत्यविधी (Cremation of an unknown dead body in the Hindu manner ) करण्यात आला. त्याचे झाले असे की, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव – शेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला होता. मृत इसमाची ओळख पटली नसल्याने शेगाव ग्रामीण पोलिसांनी तीन दिवस या मृताची ओळख पटवण्याचे आवाहन स्थानिकांना केले होते. मात्र तीन दिवस उलटूनही या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने आणि प्रथम दर्शनी हा मृतदेह मुस्लिम इसमाचा असल्याच वाटत असल्याने शेगाव शहरातील सुलतान नावाच्या सामाजिक ग्रुपला पोलिसांनी या मृतदेहावर मुस्लिम पद्धतीने अंतिम संस्कार करण्यासाठी हा मृतदेह सुपूर्द केला. अंत्यसंस्कारावेळी मृतदेह मुस्लिम व्यक्ताचा नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह सन्मानपूर्वक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडली.
शेगाव पोलिस मुस्लिम अनोळखी व्याक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सुलतान ग्रुपला देतात. यावेळीही पोलिसांना प्रथमदर्शनी मृतदेह मुस्लिम व्यक्तीचा असल्चे वाटले. नेहमीप्रमाणे अनोळखी मुस्लिम मृतदेह सुलतान ग्रुपकडे सोपविला गेला. अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडत असताना या मृतदेहाची तपासणी केली असता या मृत इसमाचा खतना झालेला नसल्याचे समोर आले. त्यामुळे हा मृतदेह हा मुस्लिम इसमाचा नसल्याचे सुलतान ग्रुपच्या लक्षात आले. यावेळी अनोळखी मृतदेहावर मुस्लिम पद्धतीने होत असलेले सोपस्कार थांबविण्यात आले आणि हा मृतदेह सन्मानपूर्वक पोलिसांना हिंदू पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी सुपूर्द करण्यात आला.
अशाप्रकारे ओळख न पटलेल्या मृतदेहांवर जमिनीमध्ये दफनविधी केला जातो. अनोळखी मृतदेह हिंदू व्यक्तीचा असो वा मुस्लिम व्यक्तीचा त्यावर पुढील कायदेशीर बाबींचा विचार करता दफनविधीच केला जातो. त्यामुळे हा मृतदेह या सुलतानग्रुपकडून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यावर हिंदू पद्धतीने अंतिमविधी करून दफन विधी करण्यात आला. या अनोळखी मृतदेहाने अंतिम संस्काराच्या वेळी धर्म बदलल्याची चर्चा परिसरात आहे.