हातात पिस्तूल घेऊन तरुणांची भररस्त्यात भटकंती

0

दर्यापूरच्या बाजारात मध्यरात्री थरार ; अमरावतीत फोफावतेय ‘गन कल्चर’
अमरावती. अमेरिकेसह अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये पिस्तूल घेऊन वावर. अचानक सार्वजनिक ठिकाणी शिरकाव करीत अंधाधुंद गोळीबार हा प्रकार काही नवा नाही. अशा अनेक घटना सातत्याने घडत असतात. पण, भारतात असा प्रकार अभावानेच दिसतो. मात्र, आता अमरावतीतही ‘गन कल्चर’ (‘Gun culture’ in Amravati) फोफावत चालले आहे. अमरावती जिल्ह्या तील दर्यापूर (Daryapur ) येथे मध्यuरात्रीच्याळ सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले दोन तरुण बाजारातून हाती पिस्तूाल घेऊन फिरतानाचा व्हीडिओ समाज माध्यमांवरून झपाट्याने व्हायरल होतो (video of two young men walking around the market with pistols going viral on social media) आहे. या घटनेने दर्यापुरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात सर्वत्र याच घटनेची चर्चा आहे. रात्री पिस्तूल घेऊन फिरणारे ते दोन तरूण कोण, ते रस्त्यावर का फिरत होतो, त्यांना अटकाव घालणारे कुणीही नव्हते काय, पोलिस यंत्रणा काय करीत होती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेला आहे आहेत.
समाज माध्यमांवरून प्रामुख्याने युवकांच्या ग्रुपमधून घटनेचा व्हीडिओ झपाट्याने व्हायरल होतो आहे. दर्यापूर या तालुक्यारच्याक मुख्याूलयी मध्य्रात्रीच्यार वेळेस रस्याे वर शुकशुकाट असताना दोन तरुण मुख्यप बाजारपेठेतून जात असल्याचचे हे दृश्या आहे. त्यांरनी तोंडाला रुमाल बांधला आहे. एका तरुणाच्या हातात स्पष्टपणे पिस्तूल दिसून येत आहे. हे तरुण हाती पिस्तूतल घेऊन का चालले होते, हा चर्चेचा विषय ठरला आहे. या तरुणांना शोधण्याहचे आव्हा न पोलिसांसमोर आहे.
अमरावती संवेदनशील जिल्हा मानला जातो. काही जिल्ह्यांना धार्मिक दंगलींचा इतिहास आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून संवेदशीलतेने घटामोडींवर लक्ष दिले जातो. दर्यापूर संवदेनशील शहरांच्याल यादीत नसले तरी गुन्हेगारी घटना नेहमीच्याच आहेत. चोरी, दरोड्याच्यार अनेक घटना अलीकडच्याम काळात घडल्यार आहेत. या दोन तरुणांनी हाती पिस्तूयल नाचवत फिरण्या चा हेतू काय होता, असा प्रश्नच विचारला जात असून पोलिसांनी या तरुणांचा शोध घ्या वा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.