नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा, पंचायत समिती नागपूर यांचे सौजन्याने 75 वर्षावरील सेवानिवृत्त शिक्षक व पंचायत समिती नागपूर येथून निवृत्त झालेल्या एकूण 90 शिक्षकांचा सत्कार समारंभ नुकताच माजी मंत्री आमदार सुनील केदार, जिप अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे, शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसुंबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा फुले सभागृह येथे करण्यात आला. या निमित्ताने संघटनेला कार्यालयासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली. 5 तारखेपर्यंत पेन्शन मिळावी अशी मागणी राज्य प्रतिनिधी विनोद राऊत यांनी केली. या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन केदार यांनी दिले. सेवानिवृत्त काळानंतर शिक्षकांनी समाज प्रबोधन करून लोकसहभाग वाढवावा, शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ असून शिक्षकांनी पूर्वीच्या काळात कुठल्याही सोयी नसताना उत्कृष्ट विद्यार्थी घडविले, चांगले शिक्षण दिले हही अभिमानाची बाब आहे असा गौरवपूर्ण उल्लेख केदार यांनी केला. अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव केला. रामभाऊ ठाकरे यांनी संचालन केले. रामभाऊ ठाकरे, मीना ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला अशोक दगडे, दीपक सावरकर, साहेबराव ठाकरे ,भीमराव बले, सूर्यकांत वंजारी, भोजराज ठाकरे, सरिता चिमणकर, रामदास किटे, शेषराव घुगल आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री विनोद राऊत, दीपक तिडके, संजय भेंडे ,रामभाऊ ठाकरे, सुनिता दामले, जयश्री कावळे, आर.बी.भोले, चंदनगीर, नामदेव वैद्य, भगवान वैद्य ,योगेश्वर कामडी, सीमा फेडर, कविता मेंघरे, मंदा बंदेलवार, बेबी किटकुले, माणिक ठाकरे ,सुनीता वैकुंठी, शकुंतला गोमासे, पद्मा ठाकरे ,सुनंदा सोनकुसरे, मीना चौधरी ,रंजना पंत, पांडुरंग गिरी, युवराज गुडधे, विद्या पेठकर, कांता गावंडे आदींनी सहकार्य केले.
