चंद्रपूर. जिल्ह्यात वन्यजीव-मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे (Wildlife-human conflict has reached its peak in the district). सावली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले. या एका वर्षातला हा ५० वा बळी ठरला आहे. बुधवारी वाघाने मूल व सावली (Mul and Sawali) तालुक्यात दोन जणांचे बळी घेतले. या दोन घटनांमुळे दहशत पसरली असतानाच आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता खेडी (Khedi) येथे स्वरूप प्रशांत येलेटीवार (५०) या महिलेला वाघाने ठार केले (woman was killed by a tiger). शेतात कापूस काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एका वर्षात वाघांनी विविध घटनांमध्ये ५० जणांचे बळी घेतल्याने नागरिकांमध्ये वन खात्याविरोधात प्रचंड रोष आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांनीदेखील वन खात्याला वाघांचा बंदोबस्त करा अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ जणू ग्रामीण नागरिकांचा कर्दनकाळ बनल्याचे दिसत आहे. वाघाने आतापर्यंत अनेक निरपराधांच्या नरडीचा घोट घेत यमसदनी पाठविले. बुधवारी दोघांचा वाघाने बळी घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. एका घटनेत शौचास गेलेल्या एका इसमाला वाघाने ठार करून ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले व ठार केले. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चकपिरंजी बिट क्रमांक ३९७ अंतर्गत येत असलेल्या रुद्रापूर येथे घडली. बाबूराव बुधाजी कांबळे (६०) असे मृतकाचे नाव असून तो रुद्रापूर येथील रहिवासी होता. वाघाने ठार केलेली एकाच आठवड्यातील दुसरी घटना असल्याने तालुक्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत.
सावली तालुका हा जंगलव्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावे ही जंगलालगत असल्याने हिंस्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुद्रापूर येथील बाबूराव हा गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळील उसेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर शौचाकरिता गेला होता. त्याच्याच पाठीमागे शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. घटनास्थळापासून जवळपास ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ही घटना गावाला लागूनच असल्याने गावकऱ्यांनी आरडाओरड करीत वाघाच्या मागे धाव घेतली. गावकऱ्यांच्या आवाजाने वाघाने बोरकुटे यांच्या शेतातच मृतदेह सोडून पळ काढला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला.
मूल तालुक्यातील कांतापेठ येथील रेल्वेलाइन परिसरात बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले व मृतदेहाला जवळपास दीड किमीपर्यंत फरफटत नेले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. देवराव लहानू सोपणकार (५५) रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या गुराख्याचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी कांतापेठ येथील शेतात काम करायला गेलेल्या महिलेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली होती. वारंवार घटना घडत असताना वनविभाग मानव- वन्यजीव
