आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा – नितेश राणे

0

नागपूर : सुंशात सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेमध्ये आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात पत्रकारांनी राणे यांना छेडले असता ते म्हणाले, मी पहिलेपासूनच आदित्या ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी करीत आहे. आता राहुल शेवाळे यांनी मागणी केल्यानुसार आदित्य ठाकरे यांची चौकशी करून नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे आहे. तो सुद्धा पुन्हा नव्याने करण्यात यावा. सुशांत सिंह, रिया चक्रवर्ती, दिशा सालियान यांची नावे जेव्हा-जेव्हा पुढे येतात तेव्हा आदित्य ठाकरे यांचही नाव पुढे येते. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गंभीरता पाहता आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा