५० खोके भूखंड ओके, हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांची नारेबाजी

0

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारला श्रीखंडाचे डबे दाखवून राज्य सरकारविरोधात तीव्र निषेध केला. भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करत सर्व विरोधीपक्षाच्या आमदारांनी श्रीखंडाच्या डब्या एका मोठ्या डब्यात टाकून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खोके.. खोकेच्या गर्जना करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाओ, दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे, ५० खोके भूखंड ओके, घ्या खोके भूखंड ओके, राज्यपालांचे करायचे काय खाली डोके वर पाय, मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी विधान भवन परिसर आजही दणाणून सोडला. मिंधे सरकार भूखंड घोटाळ्याबाबत चौकशी करण्यास तयार नसल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. महापुरुषांचा अपमान करणारे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता मिंधे सरकार मूग गिळून बसले आहे, असा आरोप करीत आंदोलन केले.

या आंदोलनात अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, राजेश टोपे, सुनील केदार, सुनील प्रभू, रोहित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील आदि सहभागी होते.

चॉकलेट ट्रफल केक आणि डोनट्स रेसिपी | Chocolate Truffle cake & Donuts Recipe | Truffle Cake | Epi.59

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा