National Girl Child Day :राष्ट्रीय बालिका दिवस

0

भारतात दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. साल २००८ मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी देश १५ वा राष्ट्रीय बालिका दिन २०२३ साजरा करत आहे. समाजात आणि विविध क्षेत्रात मुलींना भेडसावणाऱ्या असमानता, भेदभाव आणि शोषणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो

राष्ट्रीय बालिका दिन २४ जानेवारी रोजीच का साजरा केला जातो

देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गिय इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी या नावाने भारतात ओळखलं जातं. इंदिरा गांधी अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान तर होत्याच मात्र आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला होता. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्र पहिल्यांदा हाती घेतली तो दिवस होता २४ जानेवारी. राष्ट्रीय बालिका दिन नारी शक्तीची एक जाज्वल्य ओळख म्हणून इंदिराजींना समप्रित आहे. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून २४ जानेवारी रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय बालिका दिनाचा काय आहे इतिहास

साल २००८ मध्ये, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मुलीसाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात केली. भारतीय समाजात मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. मुलीला शिक्षण, नोकरी, कपडे आणि इतर अनेक बाबतीत ज्या असमानतेचा सामना करावा लागतो त्याबद्दल जागरुकता वाढवण्याचे आवाहन हा दिवस आहे.

राष्ट्रीय बालिका दिन २४ जानेवारी रोजीच का साजरा केला जातो

देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गिय इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी या नावाने भारतात ओळखलं जातं. इंदिरा गांधी अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान तर होत्याच मात्र आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला होता. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्र पहिल्यांदा हाती घेतली तो दिवस होता २४ जानेवारी. राष्ट्रीय बालिका दिन नारी शक्तीची एक जाज्वल्य ओळख म्हणून इंदिराजींना समप्रित आहे. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून २४ जानेवारी रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा