नक्षलवाद्यांची धमकी – धर्मारावबाबा यांना तात्काळ सुरक्षा द्या : अजित पवार 

0

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी धमकी दिली (Naxal Threat to NCP Leader Dharmaraobaba Atram) असल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.


नक्षलवाद्यांनी प्रेस नोट काढली आहे. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरू असून त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नक्षल यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे. लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेऊन धर्मारावबाबा आत्राम यांना तात्काळ सुरक्षा द्यावी शिवाय प्रशासनालाही सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल सरकारने घेतली आहे आणि तात्काळ सुरक्षा देण्यात येईल असे सभागृहात जाहीर केले.