“मै विवेकानंद बोल रहां हुं” संदेश पठण स्‍पर्धेचे बक्षिस वितरण संपन्‍न

0

नागपूर, 19 डिसेंबर 2022 : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूर व सौ. सुमतीबाई पांडुरंग देव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्‍या संयुक्‍तवतीने “मै विवेकानंद बोल रहां हुं” संदेश पठण स्‍पर्धा घेण्‍यात आली. स्‍पर्धेचा बक्षिस व‍ितरण सोहळा नवयुग विद्यालय, महाल येथे रविवारी पार पडला. या आंतरशालेय स्‍पर्धेत शहरातील 29 शाळांमधून 872 विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून स्‍व. म‍िनाक्षीताई आसरे स्‍मृती संस्‍थेचे संस्‍थापक राहूल आसरे, सारंग कल्‍चरल फाउंडेशनचे अध्‍यक्ष सारंग ढोक, मैत्री परिवार संस्‍थेचे अध्‍यक्ष संजय भेंडे, सुमतीबाई पांडुरंग देव मेमोरियल ट्रस्‍टच्‍या विश्‍वस्‍त बागेश्री पांडे, ‍विवेकानंद केंद्र विदर्भ विभाग प्रमुख भारत जोशी व नागपूर महानगर प्रमुख क्षमा दाभोळकर यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विविध गटातील विजेत्‍यांना पुरस्‍कार वितरीत करण्‍यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक वर्षा दारव्‍हेकर यांनी तर पाहुण्‍यांचा परिचय आसावरी कुळकर्णी यांनी करून दिला. सानिका इनामदार हिने देशभक्‍तीपर गीत सादर केले. सूत्रसंचालन मोनिका खरे व आभार प्रदर्शन दिपाली अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी अर्चना लपालकर, राधिका हिरडे, गौरी वैद्य, किरण बगाडिया,कीर्ती पुराणिक यांचे सहकार्य लाभले.

मटन रोगन जोश आणि व्हेज अंडा करी रेसिपी | Mutton Rogan Josh & Veg Anda Curry Recipe | Epi 56

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा