मुंबई MAUMBAI – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी एकमेकांना व्हीप जारी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या Sharad Pawar शरद पवार गटाचे पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड Jitendra Awad यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्याचा व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे चिफ व्हीप अनिल पाटील यांनीही आपला व्हीप जारी केला आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही गटांनी या माध्यमातून पक्षावर दावा केला असून आमचाच गट खरा असल्याची दोघांची भूमिका आहे.NCP factions issue whips to each other
विधानसभा अधिवेशनाच्या अनुषंगाने या दोन्ही गटांनी एकमेकांना व्हीप जारी केला. त्यात जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाची बसण्याची व्यवस्था विरोधी पक्षात करावी, अशी मागणी केली आहे.