अमरावतीत होणार विमानाचे नाइट लँडिंगी

0

बेलोरा विमानतळ विकासासाठी लवकरच निविदा

अमरावती. जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाची (Belora Airport) कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या विमानतळावर नाइट लँडिंगची (Night Landing ) सुविधा देखील उभारली जाणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. विमानतळाच्या संरक्षण भिंतीची कामे पूर्णत्वास आली आहेत. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत (Amravati ) साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करण्याबाबत एमएडीसीने निर्णय घेतला आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी ‘एमएडीसी’कडून राईटस् लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण, तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे. विमानतळाचे काम पूर्ण होताच अमरावतीसुद्धा हवाई मार्गाशी जोडले जाणार आहे. दळणवळणाचा सुलभ पर्याय उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा अमरावतीकरांचा विश्वास आहे.

बेलोरा विमानतळाचे अद्ययावतीकरणाच्या कामाची जबाबदारी शासनाने एमएडीसीकडे सोपविली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-७२ किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. येथे रात्रीच्यावेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. उडान ३.० मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाइन्स यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विमानतळाला पाणीपुरवठा, महावितरणमार्फत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या संरक्षक भिंतीची उभारणी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येत असून, त्याची निविदा काढण्यात येणार आहे. धावपट्टीची लांबी १३७२ वरून१८५० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. नाइट लँडिंगसाठी आवश्यक यंत्रणेसाठी १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. प्रकाश योजनेसह सर्व सुविधा उभारल्यानंतर डीजीसीएकडून पाहणी केली जाईल आणि नाइट लँडिंगची परवानगी मिळू शकेल.

 

 

 

 

 

 

पालक पत्ता चाट आणि चायनिज भेल EP.NO 86|How to make crispy palak chaat Recipe|Chinese Bhel Recipe|

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा