इंदूरः सुरक्षा यंत्रणांना हवा असलेला कुख्यात दहशतवादी र्फराज मेमन याच्या मुसक्या आवळण्यात महाराष्ट्र एटीएसला अखेर यश आलेय. सर्फराज याला इंदुरमधून ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा एनआयएने गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांना अलर्ट करणारा एक मेल पाठविला होता. या मेलमध्ये कुख्यात सरफराज मेमन हा मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या या माहितीने मुंबई पोलिसांसह सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली (Most Wanted terrorist Sarfaraj arrested) होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुर येथील सर्फराजने चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेले असून तो सध्या मुंबईत पोहोचल्याची माहिती देण्यात आली होती.
सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती एनआयए ने दिली होती. या माहितीच्या आधारे एनआयए ने पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केले होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता. आता त्याला अटक करण्यात यश आल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकालाय. मुंबई शहर कायमच दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी राहिले आहे. सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्यांपासून मुंबईसारख्या शहरांचे संरक्षण केले आहे. आता ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याची नेमकी काय योजना होती, याची माहिती घेतली जात आहे.